Home क्राईम रसलपूर येथे दोन गटात हाणामारी

रसलपूर येथे दोन गटात हाणामारी

0
65

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील रसलपूर येथे एकाच समाजातील दोन गटात हाणामारी झाल्याने तीन जण जखमी झाले असून या प्रकरणी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

रावेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमर खान असगर खान रा. रसलपूर यांनी पोलिसात तक्रार दिली की रहदारीच्या रस्त्यात शेळ्या बांधू नकोस असे सांगितल्याच्या कारणावरून भांडण होऊन आरोपी शेख चाँद शेख आमद व वगैरे ६ जणांनी हातात लाठ्या, काठ्या, व लोखंडी टॉमी घेऊन मारहाण करून, फिर्यादी व त्यांच्या सोबत वगैरे सहा जणांना लोखंडी पाईपाने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याच धमकी दिली. यात असगर खान महेमुद खान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सावदा येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी शेख चाँद यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसर्‍या गटामधील फिर्यादी ताहेरा बी शेख चाँद रा.रसुलपूर ता.रावेर यांनी तक्रार दिली की आमच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या घरातील वगैरे ६ लोकांना लाठ्या,काठया, दगड व लोखंडी पाईपने मारहाण केली यात शेख सद्दाम ,व शेख नासीर हे दोघी जखमी आहेत . सदरच्या तक्रारीवरून उमर खान असगर खान व वगैरे ६ जण यांचे विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound