लक्ष्मी नगरातून रिक्षाची चोरी; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातून रिक्षा चोरून नेल्याची घटना शनिवार 8 जून रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण मधुकर पाटील वय-३६, रा. कानळदा ता. जि. जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. त्याच्याकडे त्याची रिक्षा क्रमांक (एमएच १९ वी ५९१९) क्रमांकाची रिक्षा आहे. दरम्यान शुक्रवार ७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता चालकाने त्याची रिक्षा जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागात पार्कींगला लावलेली होती. ही रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ते शनिवार ८ जून रोजी सकाळी ९.३० वाजता दुचाकी चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे हे करीत आहे.

Protected Content