Home क्राईम एटीएम कार्डची अदलाबदल करून रिक्षाचालकाची ४० हजारांची फसवणूक

एटीएम कार्डची अदलाबदल करून रिक्षाचालकाची ४० हजारांची फसवणूक


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममध्ये एका रिक्षाचालकाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात भामट्याने मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून रिक्षाचालकाच्या खात्यातून ४० हजार रुपये लंपास केले आहेत. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास भाबलाल राठोड (वय ४०, रा. चैतन्य तांडा, करगाव, ता. चाळीसगाव) हे गुरुवारी, १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पैसे काढण्यासाठी भडगाव रोडवरील एटीएममध्ये गेले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात इसमाने नजर चुकवून राठोड यांचे एटीएम कार्ड बदलले. कार्डचा पिन नंबर हस्तगत करून संशयित आरोपीने काही वेळातच त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विकास राठोड यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound