जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘जिल्हा परिषदेला नियोजन समिती’कडून वर्षभर दिलेल्या निधीमधून खर्च व अखर्चित निधीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्या आढावा बैठक संपन्न होणार आहे.
उद्या दि.११ फेब्रुवारी रोजी, दुपारी २ वाजता पूज्य सानेगुरुजी सभागृहात ‘जिल्हा परिषदेला नियोजन समिती’कडून वर्षभर दिलेल्या निधीमधून खर्च व अखर्चित निधीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न होणार आहे
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्जवला म्हाळके, भाजपा गटनेते पोपट तात्या भोळे, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, कॉंग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस गटनेते शशिकांत साळुंके तसेच सीईओ डॉ.पंकज आशिया, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे.