जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ आज दि. ११ ऑक्टोंबर सायंकाळी ७ वाजता भाजपा कार्यलय वसंत स्मृती येथे भारतीय जनता पार्टी सह संघटन मंत्री व्ही. सतीश यांनी जळगाव शहर विधानसभा निवडणूक संचलन समितीचा आढावा घेतला.

आढावा बैठकीत आगामी विधानसभेत रणनीती विषयी संघटनात्मक बाबी व निवडणूक विषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, निवडणूक प्रमुख आ. चंदूभाई पटेल, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवडणूक संचलन समितीचे पदाधिकारी उमेदवार प्रतिनिधी विशाल त्रिपाठी, व्यवस्थापन प्रमुख महेश जोशी, समन्वयक दीपक साखरे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, सभा प्रमुख अशोक राठी उपस्थित होते. यांच्या सोबत साहित्य वाटप प्रमुख जयेश पवार, कार्यकर्ता संमेलन प्रमुख जितेंद्र मराठे, वर्गवार संमेलन प्रमुख दीपक सूर्यवंशी, अभियान समिती लीलाधर ठाकरे उपस्थित होते. बुद्धीजीवी संमेलन प्रा.भगतसिंग निकम, विपक्ष आरोप खंडन मांडण उदय भालेराव जनसह्भागीता नितीन इंगळे यातायात पी.के. बालानी, विधीविषयक अॅड.दिलीप पोकळे, बूथ समिती अध्यक्ष ललित बडगुजर, कार्यालय प्रमुख प्रकाश पंडित, संवाद केंद्र प्रमुख राजेंद्र घुगे पाटील, दौरे सभा प्रमुख महेश चौधरी, सचिन पाटील, प्रवासी समन्वयक विजय वानखेडे, अमित देशपांडे, तसेच महिला आघाडी अध्यक्ष रेखा कुलकर्णी, शोभा कुलकर्णी व जिल्हा पदाधिकारी वैशाली पाटील या बैठकीला उपस्थित होते.