विद्यार्थ्यांना दाखले वाटपसाठी महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले जलद गतीने देण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. “विद्यार्थी देशाचे भवितव्य आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी दाखले काढण्यात त्यांचा वेळ वाया जाऊ नये,” असे प्रतिपादन तहसीलदार बंडू कापसे यांनी केले.

रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये महसूल पंढरवाडा निमित्त तहसीलदार बंडू कापसे यांनी विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात पंचायत समितीचे प्रफुल्ल मानकर यांनी विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली, तर कापसे साहेबांनी शासनाच्या इतर विविध योजनांबद्दल माहिती दिली. या छोट्याखानी महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासीन तडवी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तलाठी स्वप्नील परदेशी, योगेश केदारे आणि कमलाबाई अग्रवाल हायस्कूलच्या शिक्षकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शाळेतील विद्यार्थ्यांना जागेवरच उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठीची कागदपत्रे जमा करण्यात आली. महसूल प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

 

Protected Content