जळगाव, जितेंद्र कोतवाल | नशिराबाद येथील उड्डाणपुलाखाली जामीनावर सुटलेल्यावर हल्ला करून त्याला संपविण्याची घटना घडल्यानंतर अगदी याच स्टाईलने, खरं तर याच्याही पुढे जात दुश्मनाच्या थेट घरात जाऊन गोळ्या घालण्याची शक्कल आज जळगावात सुपारीबाजांनी लढविली. यात त्यांना यश न आल्याने ते गजाआड झाले आहेत. मात्र या दोन्ही प्रकरणांमधील काही साम्ये ही विलक्षण योगायोग दर्शविणारी ठरली आहेत. यातून विशेष करून बदल्याच्या भावनेतून टोकाला जाणार्या गुन्हेगारी मानसिकतेची भयंकर काळी बाजू समोर आली आहे.
नशिराबाद येथील www.livetrends.news उड्डाणपुलाखाली हल्लेखोरांनी गोळीबारासह चॉपरचा हल्ला करून धम्मप्रिया मनोहर सुरळकर याला ठार केले. तर त्याचे वडील मनोहर सुरळकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धम्मप्रिया हा देखील सुमारे अकरा महिन्यांपूर्वी भुसावळात ११ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मोहंमद कैफ शेख शाकीर याच्या खून खटल्यातील आरोपी होता. तो अकरा महिन्यांपासून कारागृहात होता. तो कारागृहात गेल्यापासूनच मयत मोहंमद कैफचे भाऊ व वडील बदल्याच्या भावनेत जळत होते. अखेर जामीन मिळताच त्याच दिवशी हल्ला करून धम्माप्रियाला संपविण्यात आले.
अगदी याचप्रमाणे ४ नोव्हेंबर २०२०च्या रात्री राकेश अशोक सपकाळे याला आकाश मुरलीधर सपकाळे आणि त्याच्या सहकार्यांनी ठार केले होते. यानंतर सर्वच्या सर्व पाच आरोपी जामीनावर सुटले होते. www.livetrends.news यातील आकाशला संपविण्यासाठी मयत राकेशच्या भावांनी आजच्या हल्लेखोरांना सुपारी दिल्याचे आता निष्पन्न झाले आहे. म्हणजे भुसावळात थेट मयताच्या भावांनी हल्ला केला, तर जळगावात मयताच्या भावाने सुपारी दिली. यात भुसावळच्या तरूणाचा मृत्यू झाला, तर जळगावच्या तरूणाचे बोटावर निभावले.
यातील दुसरा योगायोग हा पूर्व वैमनस्याचा आहे. www.livetrends.news भुसावळातील प्रकरणात धम्माप्रिया व त्याच्या मित्रांचा मोहंमद कैफ शेख शाकीर याच्यासोबत फेब्रुवारी २०२०मध्ये वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर याच वादातून मोहंमदचा खून करण्यात आला होता. तर जळगावातील प्रकरणात लाडू गँग आणि सपकाळे बंधू (ज्यांची शिवाजीनगर ग्रुप म्हणून टोळी असल्याचे आज आकाश सपकाळेने आपल्या फिर्यादीत नमूद केलेय !) यांच्यात खुन्नस होती. आधी त्यांच्यात अनेकदा हाणामार्या झाल्या होत्या. यातूनच राकेश सपकाळेला जीव गमवावा लागला होता. म्हणजे पहिल्यांदा खुन्नस, मग खून आणि नंतर बदला अशा प्रकारातील या दोन्ही घटना घडल्या आहेत.
भुसावळ आणि जळगावच्या घटनेतील एक प्रमुख फरक म्हणजे www.livetrends.news भुसावळातील मयत आणि हल्लेखोर हे दोन्ही सर्वसाधारण गरीब परिस्थितीतील होते. तर जळगावातील सपकाळे बंधू हे आर्थिकदृष्ट्या भक्कम असून आकाश सपकाळे हा देखील मध्यमवर्गीय आहे. अर्थात, सूडाची आग ही गरीब असो, मध्यमवर्गीय की श्रीमंत….ती कुणालाही अंध बनविते. टोकाला जाण्यास भाग पाडते. भुसावळ ते जळगाव व्हाया नशिराबाद असा दोन्ही घटनांमधील सूडचक्राचा प्रवास आपल्याला हेच दर्शवत आहे.