Home धर्म-समाज अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम म्हणजे रेवा कुटी : रजनी सावकारे

अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम म्हणजे रेवा कुटी : रजनी सावकारे


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नेत्रतज्ज्ञ डॉ. नितू पाटील यांनी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असतानाच अत्यंत कठीण समजली जाणारी नर्मदा नदी परिक्रमा पायी पूर्ण करून अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा संगम घडवून आणला आहे. त्यामुळे वरणगाव येथील रेवा कुटी हे अध्यात्म आणि विज्ञानाचा दुहेरी सोनेरी संगम असलेले धार्मिक केंद्र बनले आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले.

त्या वरणगाव येथील ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे रेवा कुटी येथे आयोजित संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठणाच्या वार्षिक उपक्रमात बोलत होत्या.

पुढे बोलताना सावकारे म्हणाल्या की, वासुदेव परिवाराच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम राबविला जातो. हिंदू जनजागृतीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून ज्या ठिकाणी हनुमान मंदिरे आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम सुरू करणे ही काळाची गरज आहे. आगामी काळात रेवा कुटी येथे भक्तांची इतकी गर्दी होईल की ही जागा अपुरी पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला तपटकाठोरा येथील सरपंच रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, अतुल झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात वासुदेव परिवाराच्या प्रत्येक सदस्याने ११ वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. त्यानंतर आरती, प्रसाद वितरण आणि अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला.

या उपक्रमासाठी तबलावादक कुणाल शिंदे यांच्यासह दीपक फेंगडे, कमलेश येवले, विवेक पाटील, अनिकेत चव्हाण, उमेश माळी, मनोज गोसावी, लखन शेटे, राम शेटे, राहुल माळी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण चव्हाण महाराज यांनी केले, तर आभार प्रदर्शन कमलेश येवले यांनी मानले.


Protected Content

Play sound