यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील आदीवासी आश्रमशाळेत भारतीय सेनेत १८ वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले जवान ईश्वर पाटील यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बी.एल. देशमुख हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जवान ईश्वर पाटील यांच्याहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मनोगतातून जवान ईश्वर पाटील यांनी देशसेवेच्या भावनेतून केलेल्या कार्याचा गौरव केला. शाळेतील विदयार्थ्यांना सैन्य दलात जायचे असल्यास आपण अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल असे सेवानिवृत्त जवान ईश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या शेवटी भारताची गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव मीराताई पाटील, खजिनदार अॅड. ललित पाटील, सभासद देविदास पाटील, मंगलराव पाटील, शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे , माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील, अधीक्षक वसंत पाटील , अधिक्षिका सरीता तडवी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राकेश महाजन तर आभार विजय चव्हाण यांनी मानले.