सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघनगर परिसरातून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा १४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ४ जून रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार ५ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघनगर परिसरात रवींद्र नाटू ठाकूर वय ५९ हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी वास्तव्याला आहे. चार जून रोजी रात्री ९.३० वाजता वाघनगर स्टॉप जवळ उभे असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातून १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु मोबाईल मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर बुधवारी ५ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

Protected Content