Home क्राईम सेवानिवृत्ताचे बंद घर फोडून लाखो रूपयांचे दागिन्यांची चोरी !

सेवानिवृत्ताचे बंद घर फोडून लाखो रूपयांचे दागिन्यांची चोरी !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील ढोली गावी एक मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका सेवानिवृत्त कारकुनाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख २८ हजार ३५५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेचा सविस्तर तपशील : फिर्यादी भरत नवल पाटील (वय ६० वर्ष, रा. ढोली, ता. पारोळा, ह.मु. वर्धमान नगर) हे ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवून नेले. ५ फेब्रुवारी रोजी ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. चोरीला गेलेला माल: या घरफोडीत एकूण ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत, ज्यांची बाजारभावानुसार किंमत ४ लाख २८ हजार ३५५ रुपये इतकी आहे. यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चैन, सोन्याची लहान माळ, फॅन्से डोरले मणी असा मुद्देमाल होता. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.


Protected Content

Play sound