सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले; सोन्याचांदीचे दागिने लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्ती नगर येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. या संदर्भात बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल लक्ष्मण सपकाळे (वय ७०, रा. निवृत्ती नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच अनिल सपकाळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ हे करीत आहेत.

Protected Content