वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळात बंद पडलेल्या गाड्या पुर्ववत करण्यासाठी तसेच नविन विविध गाड्यांना थांबा मिळण्यासाठी प्रवासी संघटना, दिव्यांग संघटना, हिरकनी फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. रेल रोको आंदोलन करण्यासाठी निघालेल्या आंदोलनकर्त्यांना स्थानकाबाहेरच थांबवून मागण्यांच्या पाठपुरावा वरीष्ठस्तरावर सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील वरणगांव शहराला अनेक खेड्यांसह विज निर्मिती,हतनुर धरण व आयुध निर्माणी वरणगाव लागून आहेत.यामुळे येथील प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे . मात्र , शहरात असलेल्या रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे वरणगांव शहर प्रवासी संघटना , तिरंगा राष्ट्रध्वज समिती तसेच दिव्यांग आघाडी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी भुसावळ रेल्वे विभागाचे डिआरएम यांना निवेदन दिले होते . या निवेदनात कोरोना काळापूर्वी वरणगांव रेल्वे स्थानकावर ज्या गाड्यांना थांबा होता त्या गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात यावा , सेवाग्राम व अमरावती – सुरत गाडीला अप – डाऊन थांबा मिळावा,महाराष्ट्र एक्सप्रेसला डाऊन थांबा तसेच मेमो गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात याव्या,साईनगर शिर्डी तसेच अजमेर एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा , सिध्देश्वर नगर व फुलगाव येथे अंडर बाय – पास पुल तसेच बोदवड मार्गावरील नागेश्वर मंदिरालगत उड्डाणपूल करण्यात यावा , आचेगांव रेल्वे स्थानकावर मेमो गाडीला थांबा मिळावा तसेच अमरावती -पुणे एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा.अशा विविध मागणीसह वरणगांव रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडकी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.मात्र,रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने बुधवारी दुपारी १२ वाजता रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले जाणार होते.
मात्र, सीआरएफचे अधिकारी व पोलीस बांधवांनी मोर्चा स्थानका बाहेरच अडवून ठेवला.यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली .यामुळे भुसावळ रेल्वे विभागाचे सीजीएम प्रविण साळुंके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून तुमच्या मागणीचा पाठपुरावा वरीष्ठ स्तरावर सुरु असुन आजच्या या आंदोलनाचाही पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.तर यावेळी आमच्या मागण्यांची लवकर दखल नाही घेतल्यास एक डिसेंबरला पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
आंदोलनात यांचा होता सहभाग
माजी नगराध्यक्ष सुनील काळे, अशोक श्रीखंडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, शामराव धनगर, भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष सुनील शेट्टी, हिरकनी फाऊंडेशनचे सविताताई माळी, उपनगरध्यक्ष अध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, नगरसेविका मालाताई मेंढे, प्रवीण चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे , फजल शेख, अजमल खान, हितेश चौधरी, रमेश पालवे, गजानन वंजारी, योगेश माळी, आकाश निमकर, डॉ सादिक फहीम शेख, कदिर सेठ, सुधाकर बावणे, कृष्णा महाजन, राहुल जंजाळे, शाबांनाबी खान, कलाबई माळी, महेंद्र सैतवाल, शंकर पवार, पप्पू कोळी, मंगेश चौधरी, यांच्यासह असंख्य नागरिक व कार्यकर्ते सभागी होते.
यांनी ठेवला चोक बंदोबस्त
वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जनार्धन खंडेराव, पोहेकॉ श्रावण जवरे, नागेंद्र तायडे, सचिन गुमळकर, निलेश श्रीनाथ, साहेबराव कोळी, रेल्वे विभागाचे जीआरपीएफ व आरपीएफ अधिकारी सी.पी.सिंह, सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण राख, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनीता शुक्ला, गोपणीय विभागाचे प्रदिप शेजवळकर आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.