मनुदेवीसाठी विशेष बससेवेला प्रतिसाद !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी | खान्देशवासीयांचे कुलदेवत सातपुडा निवासनी श्रीमनुदेवी यात्रेस दर्शना भाविकांची मोठी गर्दी उसळली असुन भाविकांना मंदीरा पर्यंत जाण्यासाठी यावल आगारातुन केलेल्या एसटी बससेवेला भाविक प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे .

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खान्देश वासीयांचे कुलदैवत श्रीमनुदेवी मंदीरावर नवरात्र निमित्ताने यात्रा भरली असुन यात्रेला दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. दर्शनासाठी येणार्‍या सर्वसामान्य भाविकांची मंदीरास्थळी जाण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी यावलच्या एसटी आगारातुन विशेष बसेस सोडण्यात येत असुन भाविक प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली आहे.

या साठी मानापुरी ते श्रीमनुदेवी मंदीरापर्यत बसेस सुरू आहेत.  एसटी बस आगाराच्या या प्रयत्नास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज शुक्रवार पासून अष्टमी पर्यत दर्शनाकरीता येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांची गैरसोय होवु नये याकरीता यावल आगारातुन  बसेस वाढवण्यात येणार असल्याची माहीती यावलचे आगार व्यवस्थापक  दिलीप महाजन यांनी दिली आहे.

त्यांना यावल एसटी आगारातील वाहतुक निरिक्षक संदिप अडकमोल व  कुंदन वानखेडे विजय पाटील,राजु कोळी,अठाण भुगवाडया,अफसर तडवी, व्ही पी करांडे, सी.आर.पाटील तसेच आगारातील सर्व चालक, वाहक,यांत्रीक तसेच प्रशासकीय कर्मचारी तसेच प्रशिक्षण वाहन सहपथम म्हत्वाचे परिश्रम घेत आहेत.

Protected Content