धनाजी नाना महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेला प्रतिसाद

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या ग्रंथालय आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनसंकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत “वाचन कौशल्य कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांची वाचन कौशल्ये सुधारणे आणि वाचनाची आवड निर्माण करण्याचा होता.

या कार्यशाळेच्या उद्घाटक व प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. प्रतिभा सूर्यवंशी, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा यांच्या हस्ते कै. धनाजी नाना चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्यांनी वाचनाच्या विविध प्रकारांबद्दल आणि वाचनाचे महत्त्व सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांना वाचनाच्या योग्य पद्धतींचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्याना SQRRR या वाचनपद्धती तंत्राचा वापर करण्याचा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी केले. तसेच, कार्यशाळेचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. एस. एल. बिऱ्हाडे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी ग्रंथालय समितीचे समन्वयक डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. विजय तायडे प्रा. उमाकांत पाटील, प्रा, प्रिया बारी उपस्थित होते. या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी आयोजकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय विभागातील सहर्ष चौधरी, यामिनी पाटील, सुरेखा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content