शिरसोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराला प्रतिसाद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रूग्णालयाच्या वतीने आज तालुक्यातील शिरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विविध आजारांची ६०० जणांची मोफत तपासणी करण्यात आली. 

विविध आजारांवर ६०० जणांची मोफत तपासणी

आयोजित केलेल्या शिबीरात डायबेटीज, ब्लड प्रेशर, थाराराईड, लहान मुलांचे आजार, ब्लड गुप चेक करणे, महिलांचे आजार, मानचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध, आतड्यांचे आजार, अशक्तपणा, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, सांधे दुखी यासह विविध आजारांची लक्षणे असणाऱ्या रूग्णांची दुपारी १ वाजेपर्यंत ६०० जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

यांनी घेतले परिश्रम

डॉ. नितीन पाटील, डॉ. पंकज महाजन, डॉ.सचिन इंगळे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. हर्षल पाटील, डॉ. शैलेजा चव्हाण, डॉ. शहिद खान, डॉ. वैभव गिरी, डॉ. अतुल सोनार, डॉ. आम्रपाली काकलिया, डॉ. रेणूका चव्हाण, डॉ. रश्मी पाटील, डॉ. स्वप्निल गिरी, डॉ. देवेंद्र कोटांगले, डॉ. अमित नेमाडे, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. सुषमा चौधरी यांच्यासह आदी पथक उपस्थित होते.

 

Protected Content