यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात भाजपा युवा मोर्चा तर्फे सुरू असलेला सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने यावल येथे महाविद्यालयाच्या परिसरात संपन्न झालेल्या नोंदणीस प्रतिसाद मिळाला आहे.
भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा क्षेत्राचे आ. अमोल जावळे व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सागर कोळी, भाजपा युवा मोर्चाचे यावल तालुकाध्यक्ष यांनी तालुक्यात ग्रामीण व शहरी क्षेत्रात विविध ठीकाणी सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. दरम्यान भाजपा युवा मोर्चाच्या वतीने यावल शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात पक्षाची सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या सदस्य नोंदणीच्या अभियानास युवकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानास यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी यांच्यासह युवा मोर्चाचे सरचिटणीस मयूर पाटील, सचिन चौधरी, आकाश धनगर यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.