पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गोकुळाष्टमीनिमित्त आज दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. बहुळा धरणाला ‘कृष्ण सागर’ असे नामकरण करण्याचा ठराव मांडण्यात आला. या ठराव मंजुरीचे निवेदन आ. किशोर पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदन देऊन, मागणी करणार असल्याचं यावेळी सांगितले.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा भडगाव मतदारसंघात मागील कार्यकाळात माजी मंत्री.कै.के.एम पाटील यांनी बहुळा धरणासाठी सतत पाठपुरावा करून मतदासघांतील शेतकऱ्यांना शेतीला विविध योजनेतून पाणीपुरवठा करता यावा व नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने बहुळा धरणासाठी शासनाकडे मागणी केली होती. म्हणून कर्तृत्ववान मंत्रीचे नाव मतदारसंघात कुठे तरी कोरावं, त्याची आठवण कायम रहावी यासाठी बहुळा धरणाला कै.के.एम पाटील यांच्या नावाने म्हणजेच कृष्णा सागर हे नाव देण्याचा ण सोहळा व जलपूजन २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा नामकरण सोहळा मा.मंत्री कै.के.एम पाटील यांच्या पत्नी कमलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच जुन्या बिल्दी गावाजवळ मोकळी जागा असेल तिथे पर्यटनस्थळ म्हणून व्यवस्था करण्यात येईल, त्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटे, मा. सभापती ॲड गोरक्ष देवरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, जि.प.सदस्य रावसाहेब पाटील व राजू पाटील यांच्यासह आधी उपस्थितीत होते.