अपहरण झालेल्या तिघांची सुटका; चौघांना अटक; एमआयडीसी पोलीसांची दमदार कामगिरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याच्या नातेवाईक व मित्रांना अपहरण करून छत्तीसगड राज्यात अज्ञात व्यक्तींनी घेऊन गेले नेवून खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तीनही अपहरण केलेल्या व्यक्तींची सुटका केली असून अपहरण करणाऱ्या चार जणांना मंगळवारी ४ जून रोजी सकाळी १० वाजता छत्तीसगड राज्यातून अटक केली.

सागर कमल लुल्ला (वय-२४, रा. नवजीवन सोसायटी, भुसावळ) यांचे जळगाव शहरात शेअर मार्केटिंगचे सिंधी कॉलनी परिसरात दुकान आहे. त्यांचे नातेवाईक व मित्रांना अज्ञात व्यक्तींनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील साई सिटी येथून अपहरण करून अज्ञात व्यक्ती यांनी पळवून नेले होते. दरम्यान सदरहू अज्ञात व्यक्तींनी वेळोवेळी फिर्यादी व्यापारी सागर लुल्ला यांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सुरुवातीला २५ लाख नंतर ८ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अपहरण करणारे सर्वजण छत्तीसगड येथे गेले असल्याचे समजल्याने त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला. सदर घटनेतील तीन अपहरण झालेले व्यक्ती आणि अपहरण करणारे व्यक्ती हे छत्तीसगड येथील राजनांदगाव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी ४ जून रोजी सकाळी १० वाजता कारवाई करत अपहरण झालेले रोहित कैलास दर्डा, विशाल अनिल शुबवाणी, अजय ठाकरे यांची सुटका करण्यात आली. व संशयित आरोपी अश्विनी हरीश कुमार माखीजा (वय ३६, रा. रायपूर, छत्तीसगड), संजय आरतमनी मिश्रा (रा. रसूलहा ता. थाडपट्टी जि. प्रतापगड उत्तर प्रदेश), दिलीप शेषनाथ मिश्रा (रा.रायपूर, छत्तीसगढ), आनंद श्रीतीर्थराज मिश्रा (रा. लखनऊ तेलीबाग, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, किरण पाटील, चंदू पाटील, गणेश ठाकरे यांनी केलेली आहे. या धडक कामगिरीबद्दल एमआयडीसी पोलिसांचे कौतुक होत आहे.

Protected Content