पिकअप वाहनातील गुरांची सुटका; तीन जणांवर कारवाई

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा फाट्याजवळ महिंद्रा पिकअप वाहनातून गुरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या ३ जणांवर मंगळवार ११ जून रोजी रात्री १० वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ जून रोजी मध्यरात्री १ वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव धरणगाव तालुक्यातील सर्व फाट्याजवळ महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक (एमएच ०६ बीजी २४६९) मधून अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी ११ जून रोजी रात्री १० वाजता धरणगाव तालुक्यातील साळवा फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचून गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले. वाहनाची तपासणी केली असता गुरांना दोरीने घट्ट बांधून त्यांना कुठल्याही चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने कोंबून वाहतूक होत असल्याचे समोर आले. दरम्यान या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १२ जून रोजी मध्यरात्री १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चालक सोमनाथ कृष्ण गायकवाड, रामेश्वर पंढरीनाथ साबळे आणि राजू रमेश जाधव तिघे राहणार आव्हाना ता. भोकरदन जि. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद हे करीत आहे.

Protected Content