चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील विनापरवाना आणि अत्यंत क्रूर पद्धतीने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू गाडीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ गोवंश (गोहे) आणि एक मालवाहू गाडी असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव ते भडगाव रोडवरील पातोंडा गावानजीक असलेल्या ‘दौलता हॉटेल’ जवळ १४ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक (एम.एच. ५४ – ०३११) क्रमांकाची सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलची मालवाहू गाडी संशयास्पद रितीने जात असताना पोलिसांनी ती थांबवली. तपासणी केली असता, गाडीमध्ये ४ गोवंश (गोहे) हे दोरीच्या सहाय्याने अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेले आढळले. कोणत्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची सोय न करता, केवळ कत्तलीच्या उद्देशाने या प्राण्यांची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे समोर आले.

यावेळी पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात चार गोवंश यांना निर्दयीपणे बांधल्याचे दिसून आले. पोलीसांनी चारही गुरांची सुटका केली आहे. तर वाहन जप्त केले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



