चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील भोकरवाडा चौकामध्ये निर्दयीपणे वाहनात कोंबून बांधून ठेवलेल्या ४ गुरांची चोपडा शहर पोलीसांच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे. पोलीसांनी वाहन जप्त केले असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष भगवान डांगर वय-२५, रा.आडगाव भोंबे ता. भोकरदन जि. जालना असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, चोपडा शहरातील भोकरवाडा चौकामध्ये एका वाहनात गुरांना निर्दयीपणे बांधून ठेवल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजता छापा टाकून या गुरांची सुटका करण्यात आली असून वाहन क्रमांक (एमएच २० जीसी ८४४०) हे जप्त केले आहे. याप्रकरणी पोहेकॉ मदन पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक सुभाष भगवान डांगर वय-२५, रा. आडगाव भोंबे ता.भोकरदन जि. जळगाव जालना याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी करत आहे