पहुर, ता.जामनेर, प्रतिनिधी | पहूर कसबे गावाला शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी आज (दि.१) ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गावातील नळांना शुध्द पाणी येत नसून या पाण्यापासून अनेक लोक आजारी पडत आहेत. गावात लाखो रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्र असूनही ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेंदुर्णी रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र सुरू करून गावाला शुध्द पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती माहिती व कार्यवाहीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर किरण जाधव, वाघुर विकास आघाडीचे सुकलाल बारी, शे.शकील शे. महमंद, माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेडे, नितीन चौधरी, संतोष झंवर व समाधान घोंगडे यांच्या सह्या आहेत.