मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभा निवडणूकेची तारीख जाहीर झाल्यानंतर आज १६ ऑक्टोबर रोजी महायुती ने पत्रकार परिषद घेत त्यांचे रिपोर्ट कार्ड वाचून दाखवले आहे. आगामी निवडणूकीसाठी भाजपा, शिवसेना आणि एनसीपी हे तिन्ही पक्ष एकत्र सामोरे जाणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी मागील दीड दोन वर्षामध्ये केलेल्या कामांचा, योजनांचा पाढा वाचला आहे. महायुती साठी ‘माझी लाडकी बहीण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये महिलांना दरमहा १५०० रूपये दिले जात असल्याने ती विरोधकांच्या निशाण्यावरही आहे. पण आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ‘माझी लाडकी बहीण योजना’ कायमस्वरूपी राहणार असल्याचा पुनरूच्चार केला आहे.
देवंद्र फडणवीस यांनी मविआ वर हल्लाबोल करताना एकीकाडे ते आपण सत्तेत आल्यास १५०० वरून २००० रूपये करणार असे म्हणतात आणि दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत, असंही म्हणतात. मग त्यांनी टीका करण्यापूर्वी आधी नक्की ठरवावं की योजनांसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत की नाही? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजने ला हात लावला तर याद राखा…त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. असे म्हणाले.