ईव्हीएममध्ये फेरफारचा विरोधकांचा पुन्हा आरोप ; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

abhishek congress

 

नवी दिल्ली (प्रतिनिधी) मतदान केलेल्या पक्षाऐवजी व्हीव्हीपॅटमधून भलत्याच पक्षाच्या नावाची चिठ्ठी आल्याची मतदारांनी तक्रार केली आहे. याचा अर्थ ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला आहे,असा आरोप करत विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. सेव्ह डेमोक्रसी (लोकशाही बचाव) या नावाने काँग्रेस नेते अभिषेक मनू संघवी, कपिल सिब्बल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

 

 

लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर ईव्हीएमसोबत लावलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधील रिअॅक्शन टाइम आणि त्यातून निघणाऱ्या पावतीवरून काँग्रेससह विरोधकांनी गंभीर आरोप केला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्यानेच व्हीव्हीपॅटमधून चुकीच्या नावांची पावती येत असल्याचा दावा करत याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. ईव्हीएममध्ये मतदान केल्यानंतर त्याच्यासोबत व्हीव्हीपॅटमधून आलेली मशीन केवळ तीन सेकंद दिसली. हा वेळ खूप कमी असून तो ७ सेकंद करण्यात यावा, अशी मागणी अभिषेक मनू संघवी यांनी केली. मतदान केलेल्या पक्षाऐवजी व्हीव्हीपॅटमधून भलत्याच पक्षाच्या नावाची चिठ्ठी आल्याची मतदारांनी तक्रार केली आहे. याचा अर्थ ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला आहे, असा दावा संघवी यांनी केला. व्हीव्हीपॅटमधून निघणाऱ्या पावत्यांच्या मोजणीसाठी ५ दिवस लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

 

ईव्हीएम मशीनमध्ये गडबड नाही. पण त्यात फेरफार करण्यात आलाय. केवळ भाजपलाच मतदान जाईल, अशा पद्धतीनेच ही मशीन तयार करण्यात आल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ज्या ज्या मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जातोय, त्या त्या मशीनमधील मते केवळ भाजपलाच का जातात? असा सवालही केजरीवाल यांनी केला. मी स्वत: इंजिनीयर आहे. त्यामुळे मला बऱ्यापैकी कळते

Add Comment

Protected Content