साकळी गावातील रस्त्याची दुरूस्ती करा; मनसेची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी या गावाचा रस्ता हा मंजूर असून साकळी तालूका यावल येथे एक(१) कि मी गटारीसह रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत रू. २१६.०० (रु.दोन कोटी सोळा लाख लक्ष) मंजूर आहे.

चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लता सोनवणे यांच्या शुभहस्ते दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी भूमिपूजन सुद्धा झाले आहे. तरी आज पावतो तो रस्ता व गटारी होताना दिसले नाहीत व आता पावसाळा सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. तरी गावातील नागरिकांना रस्ता हा दयनीय अवस्थेत दिसत आहे.

तरी गावातील नागरिकांना या रस्त्याने जाताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अपघात सुद्धा झाले आहेत. मात्र सदर रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी हा साकळी गावातून ते फाट्यापर्यंतचा रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी गावकरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शासनाला करण्यात येत आहे. तसे न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांना निवेदन देतांना मुकेश सुरेश बोरसे, तालुका अध्यक्ष यावल मनसे यांच्यासह मनसेचे जनहित विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, किशोर नन्नवरे, हर्षल बाविस्कर, गौरव कोळी, शाम पवार आदी कार्यकर्त या प्रसंगी उपस्थित होते.

Protected Content