राज्य मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करा ; यावल तालुका राष्ट्रवादीची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील यावल ते भुसावळ जाणाऱ्या राज्य मार्गावरील चाळण झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी तसेच अंजाळे घाटावरील सुरक्षा कठडे म्हणुन अॅन्टी क्रॉस बैरिअर बसविण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

 

निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले आहे की , यावल ते भुसावळ मार्गावरील यावल शहरालगत असलेल्या बालाजी सिटी या परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे रस्त्याची तलाव सदृष्यस्थिती निर्माण होत आहे.  तसेच यावल ते भुसावळ या सोळा किलोमिटरच्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.  सदरचे पाणी हे वाहुन जाण्यासाठी गटार नसल्याकारणाने पावसाचे वाहुन जाणारे पाणी हे पुर्णपणे रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवतांना तारे वरची कसरत करावी लागत आहे. तरी या मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी सिमेंट कॉक्रीटचा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजुस गटारी करण्यात याव्यात. तसेच यावल ते भुसावळ दरम्यानच्या रस्त्यावर अंजाळे गावाजवळ मोर नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या प्रवाशी पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ असते तरी संभाव्य धोका लक्षात घेता या पुलाच्या दोन्ही बाजुस सुरक्षा कठडे ( अॅन्टी क्रॉस बेरिअर ) बांधण्यात यावीत. तसेच गेल्या अनेक वर्षापासुन सदरील पुलाचे हे काम कासवगती अत्यंत कमी वेगाने होत असुन या कामाची गती वाढविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Protected Content