गांधी मार्केट येथील दुकानातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गांधी मार्केट शेजारी असलेल्या एजन्सी दुकानावरून अज्ञात चोरट्याने रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ९७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय गंगाधर विसपुते सोनार (वय-५०) रा. सद्भावना व्यसनमुक्ती केंद्रजवळ, मयूर कॉलनी, पिंप्राळा हे आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला आहे. ते जळगाव शहरातील गांधी मार्केट शेजारी असलेल्या ओम एजन्सी दुकानावर सोनाराचे कारागीर म्हणून कामाला आहे. २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानातील गल्ल्यातून २२ हजार रुपयांची रोकड आणि ७५ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ९७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. यासंदर्भात संजय विसपुते (सोनार) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २१ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

 

Protected Content