चुंचाळे येथील रस्त्यांबाबत स्मरणपत्र

यावल प्रतिनिधी । भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिट आणि यावल तालुका युनिटने झोपलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना तालुक्यातील चुंचाळे गावातील रस्त्यांबाबत स्मरणपत्राव्दारे पुनश्च आठवण करुन दिली. अन्यथा, मागणी पुर्ण न झाल्यास येत्या (दि.१) सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.  

तथापि, “भीमा आर्मी” च्या शिष्टमंडळाने चुंचाळे गाव आणि चुंचाळे फाटा दरम्यानची स्थिती पाहून सुधारणा करण्याची मागणी केली होती. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने रस्ता खराब आहे. त्यामळे सर्व वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अश्या या नादुरुस्त रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी “भिम आर्मी” ने लावून धरली. मात्र झोपलेले प्रशासन काही जागे झाले नाही. काही कार्यवाही करण्यात प्रशासन अपयशी ठरले. परंतु प्रशासन जरी झोपलेले असले तरी “भिम आर्मी” प्रशासनाला जागं करेल, कारण इथं प्रश्न नागरिकांच्या जीवाचा आहे. अशी आक्रमक भूमिका घेत आज (दि.२७ ऑगस्ट) रोजी “भिम आर्मी” च्या वतीने यावल गटविकास अधिकारी, यावल सा. बां. वि., यावल तहसीलदार व फैजपूर प्रांताधिकारी कार्यालय यांना स्मरणपत्र देण्यात आले. अन्यथा, येत्या ०१ सप्टेंबर रोजी “भिम आर्मी” च्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा देण्यात आला.

तसेच, दि.०१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या रास्ता रोको आंदोलनाला पोलीस परवानगी मिळावी यासाठी यावल पोलीस निरीक्षक याना विनंतीपर निवेदन देण्यात आले. सदर निवेदन व स्मरण पत्र देते समयी, “भिम आर्मी” राज्य सचिव सुपडू संदानशिव, यावल तालुका प्रमुख मा.हेमराज भाऊ तायडे, तालुका महासचिव प्रशांत तायडे, तालुका उप-प्रमुख आकाश बिऱ्हाडे, सत्यवान तायडे, सचिन वानखेडे,  भैय्या तडवी, मा.सचिन  पारधे, पंकज डांबरे, चंदू पारधे आदी उपस्थिती होते.

 

Protected Content