धार्मिक एकात्मतेचे दर्शन ; ईदगाह मैदानाजवळ पुरग्रस्तांसाठी मदत गोळा (व्हीडीओ)

cc9cbf47 b784 4459 b983 9a25168d07d5

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम तरुणांनी सोमवारी बकरी ईदचे औचित्य साधत एकतेचे दर्शन घडविले. युथ फॉर हेल्प फाऊंडेशनतर्फे मुस्लीम कब्रस्थान ईदगाह मैदानाजवळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात ११ हजारांचा निधी जमा झाला.

 

खान्देशासह राज्यात मोठे पूरसंकट कोसळले असून लाखो लोकांना त्याचा फटका बसला आहे. जळगावातील युथ फॉर हेल्प फाऊंडेशनतर्फे ‘चला हात देवू मदतीचा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. सोमवारी ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर युथ फॉर हेल्प फाऊंडेशनतर्फे त्याठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली.

 

जळगावातील मुस्लीम बांधवांनी अर्ध्या तासात ११ हजारांची मदत दिली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, वसीम खान, सुमेध सोनवणे, जकी अहमद, योगेश चौधरी, नईम खान, चंदन मोरे, फहिम खान, शंतनू सोनवणे, रिझवान शेख, माया शेख, निखिल सोनार, फिरोज शेख, दानियल अलाउद्दीन, तबरेज सैय्यद, वाहिद खान, इमरान सैय्यद, तौसिफ खान, इफतेकार खान, फिरोज खान, इसराईल गवळी, राकेश वाणी, मयुर विसावे, शोएब शेख, सुमित कोल्हे, जावेद शेख, असरार खान, अश्रफ खान, शुभम शिंदे आदी हिंदू-मुस्लीम बांधवांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content