अरविंद केजरीवाल यांना दिलासा : सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर !

नवी दिल्ली-वृत्तसेवा | कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

खूप गाजत असलेल्या कथित दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. केजरीवाल यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक आणि जामीन नाकारण्याला आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. या याचिकेवर आज निकाल देतांना न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी त्यांना 10 लाख रुपयांचा जामीन मुचलका भरावा लागणार आहे.

आजच्या निकालात कोर्टाने म्हटले की, आरोपपत्र दाखल झाले आहे आणि खटला नजीकच्या काळात पूर्ण होणार नाही, त्यामुळे त्याला जास्त काळ तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही. मात्र, ही अटक कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत दोन्ही न्यायाधीशांची मते भिन्न आहेत. न्यायमूत सूर्यकांत आणि न्यायमूत उज्ज्वल भुईंया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायमूत सूर्यकांत यांनी केजरीवाल यांच्या अटकेचे समर्थन केले, तर न्यायमूत भुईया यांनी ते मान्य केले नाही.

सीबीआयने आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 26 जून रोजी अटक केली होती, त्यावेळी ते ईडीच्या ताब्यात होते. नंतर त्यांना ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. मात्र सीबीआयच्या खटल्यात अटक झाल्यामुळे ते तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत. यापूव दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआय प्रकरणात केजरीवाल यांच्या अटकेला न्याय दिला होता. उच्च न्यायालयाने त्यांना जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्यास सांगितले होते. 5 ऑगस्टच्या या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाच्या केजरीवालांच्या या निर्णयापूव दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह, बीआरएस नेत्या के. कविता, आपचे संपर्क प्रभारी विजय नायर या नेत्यांना सदर कथित दारू घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे. यानंतर आज केजरीवाल यांचा तुरूंगाच्या बाहेर येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.

Protected Content