जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये २६ जुलै रोजी सकाळी ८.०० वाजता ९ पर्जन्यमापन केंद्रावर सरासरी २७.६ मि.मी. ऐवढा पाऊस नोंदविण्यात आलेला आहे. ण्सध्या ५५३०३ क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणावर तो विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. धरणाच्या खालच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्यामुळे, हतनूर धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु करण्यात आलेला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरुच राहील्यास, धरणातील विसर्ग आवश्यकतेनुसार वाढविण्यात येईल याची नोंद घ्यावी. नदीपात्रातील विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने, तापी नदीकाठच्या नागरीकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन तापी पाटबंधारे विकास महामंडळ व जिल्हा प्रशासन, जळगांव यांच्या वतीने करण्यात येत आहे.