जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील प्रौढाचा मृत्यू गजानन हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची आरोप नातेवाईकांनी केला होता. यावर आज दुपारपर्यंत हॉस्पिटल आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता. मात्र हॉस्पिटलचे डॉ. विवेक चौधरी यांनी कुठल्याही हलगर्जीपणामुळे अथवा इंजेक्शनमुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली आहे.
शहरातील गजानन हॉस्पिटल येथे काल शनिवारी तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील चावदस शंकर ताडे (वय ५५) यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास प्रकृती ठिक होती. यावेळी ते नातेवाईकांशी बोलले. यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचार्यांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनसह डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चावदस ताडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी करत रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान याबाबत गजाजन हॉस्पिटलचे डॉ. विवेक चौधरी यांनी मात्र कुठल्याही हलगर्जीपणामुळे अथवा इजेंक्शन दिल्यामुळे हा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली आहे. १५ दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवरच होते. आज त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले.
आज शनिवारी सकाळी ताडे नातेवाईकांशी बोलले, चहा मागितली. तसेच नातीची भेट घ्यावयाचे असल्याचे सांगत तिला भेटायला घेवून असे चांगल्या पध्दतीने बोलले. यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास ताडे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. यावेळी जिल्हापेठ पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तसेच त्यांच्या कर्मचार्यांनी कुठलेतरी इंजेक्शन दिल्याने त्याच्या हाय पॉवरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चावदस ताडे यांचे भाऊ तथा शिरसोली येथील विद्यमान उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच कारवाईची मागणी केली.