जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील देव्हारी येथील तरूणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १४ जून रोजी सकाळी ८.३० वाजता उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. अलोक रवींद्र लुले (वय-१८, रा. देव्हारी, ता. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी १४ जून रोजी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. तेथे त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व आंघोळ करून पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने तेथेच एका झाडाला गळफास घेतला. सकाळी ८.३० वाजता शेजारील शेतातील मंडळींना अलोक हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. या विषयी त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. यावेळी नातेवाईकांनी घटनास्थळी येवून एकच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. त्याला तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले अता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. अलोक हा याच वर्षी इयत्ता अकरावी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाल्याने अलोक हा शेतीकाम संभाळत होता. त्याला एक लहान भाऊ आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.