पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील पंचायत समितीत दि. २ रोजी होणाऱ्या सभापती निवडीत शिवसेनेच्या देवगाव गणाच्या रेखाबाई भिल याना संधी मिळणार आहे.
याबाबतचे आरक्षण अनुसूचित महिला निघाल्याने एकमेव सदस्य रेखाबाई भिल यांची निवड जवळ जवळ निश्चित मानली जात आहे. उपसभापतीपदासाठी सेनेचेच मंगरूळ गणाचे प्रमोद जाधव यांची वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहे.
सद्यस्थितीत पारोळा पंचायत समितीत राष्ट्रवादी ४, शिवसेना ४ व भाजप १ असे सदस्य गणित आहे. राष्ट्रवादीच्या सदस्या छाया पाटील यांचे पती राजेंद्र बाबुराव पाटील व माजी सभापती सुनंदा पाटील यांचे पती माजी जि. प. सदस्य पांडुरंग पाटील यांनी सेनेत प्रवेश केल्याने सेनेचे संख्याबळ हे ३ वरून ५ पोहचले आहे. प्रथम छाया बाबुराव पाटील त्यानंतर छाया जितेंद्र पाटील व आता रेखा भिल या तिन्ही सदस्यांना सेनेच्या माध्यमातून सभापतीपद मिळाले असून विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सदस्य ज्ञानेश्वर पाटील व अशोक पाटील यांचाही सेनेच्या सदस्यांना पाठिंबा मिळत असल्याने यापूर्वी सदर प्रकिया ही बिनविरोध झाली होती. त्यामुळे दि. २ रोजी सभापती व उपसभापती निवड ही देखील बिनविरोध होण्याची दाट श्यक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडी पाहता,
निवड प्रकियेत आजी माजी आमदार उपस्थित राहणार का असे प्रश्न चर्चिले जात आहे.