शरीर संबंधाला नकार, पत्नीची हत्या करून स्वत:चे गुप्तांग कापले

knife and blood 696x447

 

सिद्धार्थनगर (वृत्तसंस्था) शरीर संबंधाला नकार दिला म्हणून रागाच्या भरात पत्नीची हत्या करून एका व्यक्तीने स्वत:चेच गुप्तांग कापल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात घडली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, अनवारूल हसन हा सिद्धार्थनगर जिल्ह्यातील काकरा पोखरचा रहिवाशी असून सुरत येथे काम करतो. वर्षभरापूर्वी त्याचे मेहनाज नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. सुरतहून सुट्टीसाठी तो घरी आल्यावर एकेदिवशी घरात कोणीच नसताना त्याने मेहनाज जवळ शरीर संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतू मेहनाजने नकार देताच त्याने मेहनाजचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत:चे गुप्तांगही कापले. दरम्यान, रागाच्या भरात आपण हे कृत्य केले असल्याची कबूली अनवारूल हसनने दिली आहे.

Protected Content