Home आरोग्य रेकी चिकित्सा ही कोणत्याही उपचारपद्धतीस पूरक – भास्कर खाचणे  

रेकी चिकित्सा ही कोणत्याही उपचारपद्धतीस पूरक – भास्कर खाचणे  

0
166

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । औषधोपचार कोणतेही असो – अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी किंवा इतर कोणतीही पद्धत – त्या सोबत रेकी चिकित्सा केली, तर आजार अधिक लवकर बरा होतो आणि आर्थिकदृष्ट्याही बचत होते, असे प्रतिपादन रेकी ग्रँडमास्टर भास्कर खाचणे यांनी आज येथे केले. ते ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत बोलत होते.

ही सभा भुसावळच्या रिंग रोड येथील सभागृहात पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील होते. सचिव सतीश जंगले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर खाचणे यांच्यासह संजय चौधरी, भानुदास पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना व हनुमान चालीसा पठणाने झाली. यानंतर ‘रेकी एक उपचार पद्धती’ या विषयावर भास्कर खाचणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

रेकी चिकित्सा ही एक प्राचीन, सौम्य आणि नॉन-इनवेसिव्ह (शरीरात खोलवर न जाणारी) उपचारपद्धती असून, ती कोणत्याही औषधोपचारास पूरक ठरते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसाचा एक ‘और्‍या’ म्हणजे आभा असतो. जेव्हा तो आभा असंतुलित होतो, तेव्हा शरीरात व्याधी निर्माण होतात. ही ऊर्जा शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करते. रेकीमध्ये, थेरपिस्ट रुग्णाच्या शरीरावर किंवा जवळ हात ठेवून सकारात्मक ऊर्जा हस्तांतरित करतो. यामुळे तणाव कमी होतो, मन शांत होते आणि शरीराच्या चक्रांचे संतुलन राखले जाते.

आपल्या शरीरात सात उर्जाचक्रे असतात. ही सर्व चक्रे जर समतोल आणि योग्य रीतीने कार्यरत असतील, तर आरोग्य चांगले राहते आणि जीवनात सकारात्मकता वाढते. रेकी चिकित्सा हे केवळ आजार बरे करण्याचे साधन नाही, तर संपूर्ण जीवनशैलीत बदल घडवण्याचे माध्यम आहे, असेही खाचणे यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांवर प्रत्यक्ष उपचारपद्धती दाखवून दिली आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसनही केले.

सभेला शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुरेश बेलसरे, पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, ज्योती चौधरी, राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे, लोटू फिरके, अलका इंगळे, सोपान नेमाडे, अशोक नेहेते, विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील, अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे, रजनी तळेले, यशवंत वारके, विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे, पाटील, अरुण धांडे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, धनराज पाटील, भानुदास पाटील, सुनील सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी विश्व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.


Protected Content

Play sound