यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी २०२४-२०२५ वर्षाच्या खरीप हंगामात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडचे मुग /उडीद / सोयाबीन खरेदी केंद्र यावल उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत खरेदीसाठी नाव नोंदणी जिल्हा पणन अधिकारी यांचे आदेशानुसार ७ ऑक्टोंबर २०२४ पासून सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन २०२४ खरीप पिक पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा घेऊन संस्थेशी संपर्क करावा. शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ; अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते याची सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी असे राकेश फेगडे यांनी सांगीतले असुन, सदरचे हमीभाव मुग :-८६८२ ₹ (उत्पादकता ३ क्वींटल हेक्टरी ) उडिद :- ७४०० ₹ (उत्पादकता ३क्वींटल ५० किलो हेक्टर) सोयाबीन :- ४८९२ ₹ (उत्पादकता :-१० क्वींटल हेक्टरी) राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व वि.का. सोसायटी, कोरपावली तालुका यावल चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी दिली आहे.