Home Cities जळगाव हातमाग विणकरांसाठी विभागीय कापड स्पर्धा; १९ मार्चला आयोजन

हातमाग विणकरांसाठी विभागीय कापड स्पर्धा; १९ मार्चला आयोजन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट उत्पादनांना सन्मानित करण्यासाठी मुंबई विभागात “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे स्वरूप:
स्पर्धेत उत्कृष्ट नमुन्यांना २५,००० रुपये (प्रथम), २०,००० रुपये (द्वितीय) आणि १५,००० रुपये (तृतीय) अशी बक्षिसे दिली जातील. नमुने १९ मार्च रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. नमुन्यासोबत विणकराचे नाव, पत्ता, धाग्याचा प्रकार, डिझाईन, रंग आणि कापडाची माहिती आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान १ नग किंवा २ मीटर कापड आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, भोरूका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, ५ वा मजला, १२८ ब पुना स्ट्रीट, मस्जीद (पूर्व) ४०० ००९, पत्यावर किंवा Email-rddtextiles3mumbai@rediffmail.com, दुरध्वनी क्रमांक :- ०२२ – २३७००६११ यावर संपर्क करावा.


Protected Content

Play sound