Home क्राईम चुंबनास नकार ; मैत्रिणीचा खून

चुंबनास नकार ; मैत्रिणीचा खून


muder 3
 

जबलपूर (मध्य प्रदेश) चुंबन घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रीण विद्यार्थिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपुरातील बिजापुरी गावात घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार विद्यार्थिनीचा बळी घेणारा आरोपी हा तिचा मित्र होता. घटना घडली त्या दिवशी दोघे कनिष्ठ महाविद्यालयातून घरी जाताना आड वाटेला जात एका कालव्याजवळ बसले होते. याच ठिकाणी आरोपीने विद्यार्थिनीकडे चुंबनाची मागणी केली. त्यानंतर त्याने बळजबरी करत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला दूर लोटले. यामुळे आरोपीला राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने विद्यार्थिनीला जोराचा धक्का दिला आणि ती खाली असलेल्या दगडावर आदळली. विद्यार्थिनीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. आपली मैत्रीण मृत पावल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी घाबरला आणि त्याने तिचा मृतदेह पाचोळ्यामध्ये झाकून तिथून काढता पाय घेतला.


Protected Content

Play sound