रासायनिक खतांच्या किमती कमी करा,अन्यथा आंदोलन ; रयत सेनेचा इशारा

105b0347 eb75 40b4 9fe6 ec8ee3029db4

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) मागील वर्षी महाराष्ट्र राज्यात जवळपास सर्वच  जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा थेट परिणाम पिकावर झाला. परिणामी भूजल पातळी देखील खालावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय घट येवून भांडवल सुद्धा निघाले नाही. अशा गंभीर परीस्थितीत रासायनिक खंताच्या प्रत्येक बॅग मागे २०० रुपयानी भाव वाढविण्यात आला आहे. ही दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी. अन्यथा शेतक-यांसोबत रयत सेना आमरण उपोषण करेल, असा ईशारा रयत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना आज या संदर्भात एक निवेदन देण्यात आले.

 

 

रयत सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा थेट परिणाम पिकावर झाला. परिणामी भूजल पातळी देखील खालावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय घट येवून  भांडवल सुद्धा निघाले नाही.  तरी देखील या परीस्थितून शेतकरी राजा थोडाफार सावरून पुढच्या कामाला लागला आहे. शेतीसाठी कर्ज घेऊन पिकाची लागवड व खर्च केला होता. त्यातून उत्पन्न देखील आले नाही. मागील वर्षी दुष्काळ असताना देखील शासनाने चालू वर्षी रासायनिक खताच्या प्रती बॅगमध्ये सरासरी २००  रुपयांनी वाढ केली आहे. हि वाढ शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. अगोदरच दुष्काळात होरपळलेला शेतकरी त्यात ही  नवीन दरवाढ न परवडणारी आहे.

 

 

येत्या एक महिन्यात शेतकरी शेत मशागतीला लागून पेरणी करणार आहे. त्यांना बि बियाणे व खते लागणार असल्याने ऐन मौसमात खतांची टंचाई भासू नये, म्हणून बरेच शेतकरी हे रासायनिक खतांची आगोदर खरेदी करून घेतात. आज स्थितीत कुठल्याही  शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध नाही. तरी शेतकरी कर्ज काढून अथवा व्याजाने पैसे घेऊन तर काही शेतकरी पत्नीच्या अंगावरील थोड्याफार प्रमाणात असलेले दागिने मोडून तो खर्च शेतावर करतात. वाढलेल्या दरात रासायनिक खते घेणे न परवडणारे असून ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनस्तरावरून रासायनिक खताचे भाव कमी करावेत  व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. दरवाढ कमी न केल्यास रयत सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. त्यावेळी होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

 

दरम्यान, निवेदनाच्या प्रती केंद्रीय कृषी मंत्री, मुख्यमंत्री, कृषी मंत्रालय महाराष्ट्र,पालकमंत्री जळगाव,,जिल्हाधिकारी जळगाव,पोलीस अधीक्षक जळगाव,प्रांताधिकारी चाळीसगाव,आमदार चाळीसगाव, तालुका कृषी कार्यालय चाळीसगाव,जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विभाग जळगाव,कृषी अधिकारी प स चाळीसगाव, गटविकास अधिकारी चाळीसगाव,शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.

 

 

या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश समन्वयक पी.एन. पाटील,जिल्हाध्यक्ष संजय कापसे,युवक जिल्हाध्यक्ष आकाश धुमाळ,शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष योगेश पाटील,शिक्षक सेना शहरध्यक्ष सचिन नागमोती, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे,शहर कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर,विभाग प्रमुख गोपाल देशमुख, मोनल पाटील,सुनिल जाधव,अमोल पाटील,राजेश पाटील,मधुकर चव्हाण,छोटू अहिरे, रवींद्र मांडोळे, विक्की गायकवाड,मंगेश देठे, स्वप्नील गायकवाड,गौरव पाटील,अनिकेत शिंदे,सागर चव्हाण, विकास पवार,सागर पाटील यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आदींच्या सह्या आहेत.

Add Comment

Protected Content