Home Cities जळगाव जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ८७.२२ टक्के विक्रमी मतदान; मतमोजणीला सुरूवात !

जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ८७.२२ टक्के विक्रमी मतदान; मतमोजणीला सुरूवात !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा वकील संघाच्या नवीन पदाधिकारी निवडीसाठी मंगळवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत विक्रमी ८७.२२ टक्के मतदान झाले असून, १०१० सदस्यांपैकी ८८१ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष या प्रत्येकी एक जागेसाठी, तर पुरुष सदस्यांच्या आठ जागांसाठी मतदान घेण्यात आले. एकूण १३ जागांपैकी, दोन महिला सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. महिला सदस्यांच्या दोन जागांसाठी तीन अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी एक अर्ज बाद झाल्याने ॲड. शारदा सोनवणे आणि कल्पना शिंदे यांची निवड बिनविरोध झाली होती. उर्वरीत ११ जागांसाठी मंगळवार ५ ऑगस्ट रोजी मतदान झाले.

सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. दुपारी चार वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, आज रात्री उशिरापर्यंत या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा वकील संघाचे नवीन पदाधिकारी कोण असतील, याकडे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound