श्रीलंकेत पुन्हा स्फोट !

Sri Lanka

 

कोलंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरातील आठ बॉम्बस्फोटांची घटना ताजी असतानाच आता कोलंबोपासून ४० किलोमीटर असलेल्या पुगोडा हे शहर स्फोटांच्या आवाजाने हादरले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे बॉम्बस्फोटच आहेत का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामुळे हादरुन गेलेल्या श्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने भीतीची वातावरण पसरलेले आहे. पुगोडातील स्थानिक कोर्टाच्या इमारतीजवळील मोकळ्या जागेवर हे स्फोट झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे स्फोट नेमके कशामुळे झाले याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, रविवारी, ‘ईस्टर संडे’च्या दिवशी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३५९ नागरिकांचा मृत्यू झाला तर ५०० जण जखमी झाले होते.

Add Comment

Protected Content