पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील हनुमंत खेडे येथील श्री बालाजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हनुमंतखेडे येथे सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा संपन्न व सामूहिक सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद मराठी शाळा येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चेतन नानाभाऊ पाटील सर होते. सुरुवातीला ग्रंथालयाचे सचिव प्रकाश जगन्नाथ पाटील यांनी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाबद्दल प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.प्राथमिक शाळा हनुमंतखेडे चेतन पाटील यांनी वाचकांना मार्गदर्शन केले मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याचा परिणाम मुलांच्या वाचन संस्कृती होऊ नये म्हणून हा शासनाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच भुषण पाटील, शुभम पाटील यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले “वाचेल तो वाचेल” ही युक्ती त्यांनी साक्षात विद्यार्थ्यांच्या मनात रुजवून दिली तसेच मोलाचे मार्गदर्शन केले.
उच्चतंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगांव अंतर्गत श्री बालाजी सार्वजनिक वाचनालय हनुमंतखेडे यांच्यातर्फे जि प मराठी शाळा हनुमंतखेडे येथे दि.1.जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ यादरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन वाचन संवाद, सामूहिक वाचन,करण्यात आले.