फेरपरीक्षा; सीबीएसई ला भूमिकेसाठी ७ तारखेची मुदत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रस्तावित आहेत. ज्यांना आपले गुण वाढवायचे आहेत, त्यांच्या श्रेणीसुधार परीक्षाही याच वेळी घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने सीबीएसईला ७ सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. दहावी आणि बारावीचे मिळून २,३७,८४९ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणी लागू आहे. ‘करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षा रद्द कराव्यात,’ अशी मागणी करणारी याचिका विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे

Protected Content