जळगाव प्रतिनिधी । यावल व भुसावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे स्थायित्व प्रस्ताव प्रलंबीत असून ते कामे लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी शिक्षण विभागातील कर्मचार्यांना दिल्या.
सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निर्दशनात आले. यावेळी अनुपस्थित कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना दिल्या. तसेच यावल व भुसावळ पंचायत समिती तालुक्यातील शिक्षकांचे गेल्या १२ वर्षापासुन स्थायित्व प्रस्ताव सादर करण्यात आलेले असुन अद्याप पर्यंत प्रस्तावांना मान्यता का मिळालेली नाही? अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी सभापती पाटील यांनी लागलीच सूचना देऊन या शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे पुन्हा हे विषय माझ्या कडे यायला नको असे सक्त ताकीद कर्मचार्यांना दिले.
दरम्यान, जिल्हातील शिक्षकांचे ईतर सर्व प्रलंबित कामकाज लवकर पुर्ण करण्याबाबत संबंधित कर्मचारी यांना सूचना दिल्या व प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करण्याबाबत व काही अडीअडचणी असल्यास मला प्रत्यक्ष येऊन सांगावे असे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांनी कर्मचार्यांना सुचविले आहे.