अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील धार येथील रविंद्र पाटील यांची माहिती अधिकार तसेच पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच याबाबतचे नियुक्ती पत्र देखील त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने तसेच संघटनेची ध्येय धोरण तळागाळातील सामान्य पर्यंत पोहचण्यासाठी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र राज्य मुख्यसचिव इद्रीस सिद्धिकी यांच्या संमतीने तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या शिफारसी नुसार राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही दिनांक ३०-११-२०२२ पर्यंत वैध असेल; असे नियुक्ती पत्रांवये सूचित केले आहे.