पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील तर शहराध्यक्षपदी मुकुंदा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.
पारोळा शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार आणि त्यांचे समर्थक अनिल पाटील व मनीष पाटील व अन्य सहकार्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील शहराध्यक्ष नगरसेवक मनीष पाटील यांनी पदाच्या राजीनामा दिला होता. त्यामुळे दोन्ही पदे खाली होती.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका अध्यक्ष व पारोळा शहर अध्यक्षची नियुक्ती भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी प्रदेश, रवि अनासपुरे प्रदेश मुख्यालय प्रभारी यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी केली.
यात भारतीय जनता पार्टी पारोळा तालुकाध्यक्षपदी रविद्र भोमा पाटील यांची तर पारोळा शहरध्यक्षपदी मुकुंदा भिका चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील भाजपाचे आजी-माजी पदाधिकार्यांकडून व माजी खासदार जळगाव जिल्ह्याचे ए. टी. नाना पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, माजी तालुकाध्यक्ष अतुल मोरे आदींसह इतरांनी या दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन केले आहे.