अमळनेर प्रतिनिधी । शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमदिरात सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारलेला असताना महाराजांच्या जयंतीदिनीच याचे राजकारण करून हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणार्या नगरपालिकेतील सत्ताधार्यांचा आज हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरीं यांनी तीव्र निषेध केला.
अमळनेरकरांसाठी स्वप्नपूर्ती ठरलेला हा पुतळा असताना या भव्य पुतळ्याची देखभाल करण्यास असमर्थ ठरलेल्या व सत्तेच्या मस्तीत गर्ग असलेल्या सत्ताधारीनां किमान महाराजांच्या जयंती दिनी देखील पॉलीश करण्याचा विसर पडल्याने डॉ चौधरी यांनी खेद व्यक्त केला. संबंधीत अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अथक प्रयत्न केले आहेत. यामुळे हा पुतळा देखील त्यांचाच आहे असा प्रचार सत्ताधार्यांनी वारंवार केला असून यामुळेच याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. व जेथे कमी तेथे आम्ही असे आवर्जून सांगत आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीने पुतळ्यास पॉलिश व सामूहिक अभिवादन करण्याचे त्यांनी जाहीर केले.
यानुसार आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पॉलीश करण्यासाठी धुळे येथून विषेश टिम दाखल होऊन संपूर्ण पुतळ्यास पॉलिश करण्यात आली. उपस्थित सर्व शिवप्रेमी युवकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन प्रचंड जयघोष केला.याप्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, न.प. गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक श्याम पाटील, नरेंद्र चौधरी, रणजित शिंदे, धनंजय महाजन, बाळासाहेब संदांनशीव, सुनील भामरे, गुलाम नबी, नाविद शेख, किरण गोसावी, राजेंद्र पाटील, मचिंद्र ट्रेलर, संतोष लोहरे, राहुल पाटील, मनोज शिंगाने, पंकज भावसार, तसेच अमळनेर शहर युवा मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.