रावेर प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ नागरिक वारकरी संघातर्फे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शन घेण्यासाठी सर्व जेष्ठ नागरिक आज महामंडळाच्या बसने प्रस्थान करत आहेत.
तालुक्यातील रसलपुर, खिरोदा, यावल, रमजीपुर, बक्षीपुर, येथील जेष्ठ नागरीक आषाढी वारकरी संघातर्फे पंढरपुर विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुर वारीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रमाणे आज 84 जेष्ठ महिला व पुरुष हे शहरातील माऊली हॉस्पिटल जवळ दाखल झाले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, डॉ. योगिता पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.एस.आर.पाटील, एस.बी. महाजन यांनी वारकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर, रावेर एसटी आगराचे प्रमुख सी.एस. चौधरी, बस चालक आर.आर.कोळी, एस.के. सोनवणे, वाहक शाम भांबरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मधुकर वाघे, पुंडलिक पाटील, विश्वनाथ महाजन, काशीनाथ धनके, प्रभाकर पाटील हे वारीचे नेतृत्व करीत आहे.